अमृत योजना 2025
टायपिंग झालेल्यानां महाराष्ट्र सरकार तर्फे मिळणार 6500 Rs

संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु.६,५००/- प्रोत्साहनात्मक मिळणार आहेत तर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु.५,३००/- प्रोत्साहनात्मक मिळणार आहेत. या योजनेसाठी नक्की पात्रता काय आहे तसेच अर्ज कसा करायचा अशी सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
तुम्ही दहावी पास आहात टायपिंग झालंय मग मराठी हिंदी इंग्लिश तुमचं टायपिंग झालंय तर साडेसहा हजार रुपये आणि शॉर्ट हॅन्ड तुमचं झालंय तर 5300 रुपये डीबीटी द्वारे डायरेक्ट तुम्हाला बँकेमध्ये मिळणार आहे महाराष्ट्र शासन व अमृत यांच्यातर्फे अमृत योजना आहे याचा फायदा तुम्ही घेऊ शकताय आणि हे पैसे तुम्ही मिळू शकणार आहात चांगली अपॉर्चुनिटी यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत केली जाते त्यामुळे जे जे पण तुमचे मित्र आहेत ज्यांचं टायपिंग झालंय नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. मग कशाप्रकारे अप्लाय करायचं फॉर्म कसा भरायचा फॉर्म भरताना हे घोषणापत्र आहेत ते आपल्याला भरावं लागतं अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहे पात्रता काय निकष काय सगळी माहिती पाहूया .
त्यामुळे तुम्ही एलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा तुमचे मित्र फॅमिली मेंबर असेल तर त्यांच्यासोबत शेअर करा नक्की फायदा
अमृत म्हणजेच महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्यातर्फे ही संधी आली आहे ज्याला अमृत योजना म्हणतात जसं की तुम्ही बघा भरपूर साऱ्या योजना आहे म्हणजे.
त्यांचं यूपीएससी झालंय एमपीएससी झालंय किंवा कृषी उद्योग प्रशिक्षण योजना ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण असे अनेक सारे प्रशिक्षण इथे दिले जातात स्वयं रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी प्रोव्हाइड केल्या जातात मग बेकरी प्रशिक्षण वगैरे झालं हे पण तुम्हाला मिळतं .
योजनेचा उद्देश:
शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे.
अमृतचा लक्षगट:
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत समकक्ष योजनाचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींचा, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवार.
लाभार्थी पात्रता निकष:
1. अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
2. अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
3. अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत स्वस्वाक्षरीत प्रत सादर करणे बंधनकारक राहील.
4. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फी / शुल्काची स्वस्वाक्षरीत (Self-attested) पावती आवश्यक आहे.
5. उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) व रद्द केलेल्या चेकची प्रत जोडावी.
लाभासाठी अर्ज करण्याची पध्दत:
अमृतच्या लाभार्थी निकषांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांनी विहीत नमुन्यामध्ये अमृत संस्थेच्या या www.mahaamrut.org.in संकेतस्थळावरुन अर्ज करावा. त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्र / दस्तऐवज अपलोड करावेत. अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह स्वस्वाक्षरीत (Self-attested) करून विहित मुदतीत अमृतच्या पुणे येथील कार्यालयास पाठविणे आवश्यक राहील.
लाभाचे स्वरूप:
1. जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (कॉम्पुटर टायपिंग मराठी / हिंदी, इंग्रजी ४०, ५० व ६० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम रु.६,५००/- (अक्षरी रुपये सहा हजार पाचशे फक्त) प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
2. जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन (मराठी / हिंदी ६०, ८०, १०० व १२० शब्द प्रति मिनिट तसेच, इंग्रजी लघुलेखन ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५० व १६० शब्द प्रति मिनिट) परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम रु.५,३००/- (अक्षरी रुपये. पाच हजार तीनशे फक्त) प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
3. प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अमृत संस्थे मार्फत लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाईल.
4. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही.
FAQ's
संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजना प्रश्नावली
१. या योजनेच्या लाभासाठी शैक्षणिक निकष काय आहेत?
या योजनेसाठी आवश्यक शैक्षणिक निकष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निर्धारित केल्यानुसार किमान १० वी उत्तीर्ण राहतील.
२. एकच उमेदवार एकावेळी टंकलेखन व लघुलेखन या दोन्ही विषयातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यास दोन्ही परीक्षांचा लाभ मिळेल काय?
होय. यामध्ये एका सत्रात जास्तीत जास्त ०३ (तीन) विषय संगणक टंकलेखनासाठी व ०३ (तीन) विषय लघुलेखनासाठी अनुज्ञेय राहतील.
३. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मान्यता प्राप्त राज्यातील विविध नोंदणीकृत शासनमान्य टंकलेखन संस्थांचे व्यतिरिक्त इतर संस्थांमध्ये परीक्षा देवून उत्तीर्ण झाल्यास योजनेचा लाभ मिळेल का?
नाही.
४. कोणते उमेदवार ह्यासाठी अर्ज करू शकतात ?
डिसेंबर २०२४ मध्ये शासकीय टांकलेखन व लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
अधिक माहिती करिता खालील व्हिडओ पहा
अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा.
उमेदवारांचे-स्वयंघोषणापत्र : येथे क्लिक करा
संस्थांचालकांचे-स्वयंघोषणपत्र : येथे क्लिक करा.